अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजीतील लाभार्थ्यांसाठी कर्ज-अनुदान योजना

नांदेड (प्रतिनिधी) :- हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांची उपकंपनी) नांदेड जिल्हा कार्यालयामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज आणि अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनासाठी मुख्यालयाकडून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.

याअंतर्गत अनुदान योजनेसाठी- 5, बीजभांडवल योजनेसाठी 5, थेट कर्ज योजनेसाठी 10, एनएसएफडीसी टर्म लोनसाठी 4, एनएसएफडीसी सूक्ष्म पतपुरवठयासाठी 3, आणि एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेसाठी 3 असे उदिदष्ट प्राप्त झाले आहे. अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जासोबत जातीचा व उत्पन्नाचा मुळ दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, रहिवासी प्रमाणपत्र, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, आधार लिंक असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, उद्यम आधार, टी.सी. व मार्क मेमोसारखी शैक्षणिक कागदपत्रे, संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण व अनुभव प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना (शॉप क्ट) आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे अनिवार्य आहे.

इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नमस्कार चौक, ग्यानमाता शाळे समोर नांदेड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. नांदेड जिल्हयातील अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजीतील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या कर्ज आणि अनुदान योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *