फेलोशिपसाठी संशोधकांचे बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य पिएच.डी संशॊधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे मागील दहा- बारा दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे परंतु दिनांक 09 ऑक्टोबर पासून प्रतीक पंचशील व मनीषा गवळी यांनी आमरण उपोषण सुरूकेले आहे. तरी पण बार्टी प्रशासन साधी दाखल घेत नाही. केवळ तुमचे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दिले आहे. वरिष्ठ कार्यालयातून आदेश येईल त्याप्रमाणे कार्यवाही करू असे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्य पिएच.डी संशॊधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्यावतीने संशोधक मागील तीन वर्षांपासून फेलोशिपसाठी बार्टी संस्थेला अर्ज विनंत्या करीत आहेत. फेलोशिपची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याना आमरण उपोषण करावे लागले तेव्हाकुठे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्या जाहिरातीमध्ये सर्वंकष धोरण लागू करून सारथी, महाज्योती, अमृत आदी संस्थांच्या बरोबरीला नेऊन बसवीले. 2023, 2024 व 2025 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्रीत जाहिरात काढली त्यात 35 वर्ष वयाची अट, प्रत्येक वर्षी केवळ 100 विद्यार्थी, पी जी ला 55 टक्क्याची अट अश्या अनेक जाचक अटी टाकून मागासवर्गीय संशोधनासाठी फेलोशिपची दारेच बंद करण्याचाच घाट घातला. मुळात मागासवर्गीयांना विशेष दर्जाअसताना देखील प्रस्थापितांना सोबत बसवून फेलोशिप पासून वंचित ठेवण्याचा डाव सरकारच्या वतीने आखला जात आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरुद्ध

१} बार्टी ने फेल्लोशिप ऑनलाईन फॉर्म भरन्यासाठी मुदत वाढ करावी.
२} वयाची अट कायमची रद्द करावी.
३}सर्वंकष समान निकष धोरण कायमचे रद्द करण्यात यावे.
४}२०२३ व २०२४ आणि २०२५ च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेल्लोवशिप मंजूर करावी.

या मागण्यासाठी संशोधक विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. सरकार आता तरी आमच्याकडे लक्ष देईल का? अशी आर्त हाक संशोधक विद्यार्थी देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *