नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाची व्दिवार्षीक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध आदेश निर्गमीत

नांदेड (प्रतिनिधी) :- भारत निवडणूक आयोगाने नांदेड विधान परिषदेसह महाराष्‍ट्र विधान परिषदेच्‍या १६ स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाची व्दिवार्षीक निवडणूक-२०२६ ची सोमवार १८ मे २०२६ रोजी घोषणा केली आहे. या घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाची व्दिवार्षीक निवडणूक-२०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पडावी या दृष्‍टीकोणातून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्‍वये जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध आदेश सोमवार १८ मे २०२६ रोजी निर्गमीत केले आहेत. हा आदेश निर्गमीत केल्याच्या दिनांकापासून २५ जून २०२६ रोजी २४ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात लागू राहील.

शासकीय-निमशासकीय विश्रामगृहाचा वापर
शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस नांदेड जिल्‍ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विश्रामगृहाचा वापर करणे संबंधित विभागाने अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिका-याच्‍या पूर्व परवानगीशिवाय प्रवेश करण्‍यास प्रतिबंध केले आहे.

ध्‍वनिक्षेपक-ध्‍वनिवर्धकाचा वापर नियमन व नियंत्रण
कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व धवनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिका-याच्‍या पुर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्‍या वाहनांवर ध्‍वनिक्षेप व ध्‍वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्‍ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय ३१ जुलै २०१३ नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनि प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी ६ वाजेपुर्वी आणि रात्री १० वाजेनंतर करता येणार नाही.

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध
नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये निवडणूक कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास प्रतिबंधीत केले आहे.

वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे आदी बाबींसाठी प्रतिबंध
जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वाहनांनवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्‍यादी बाबीसाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. फिरत्‍या वाहनांनवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा, इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यति‍रीक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही.

तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यावर निर्बंध
धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणा जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यावर निर्बंध लागू राहतील. नांदेड जिल्‍हा हद्दीत निवडणूक कालावधीत धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणा जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास याद्वारे प्रतिबंधीत केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे फलके,भाषण देण्यावर निर्बंध
नांदेड जिल्‍हा हद्दीत निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंधीत केले आहे.

मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध
निवडणूकीचे कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास याद्वारे प्रतिबंधीत केले आहे.

धरणे-आंदोलन, मोर्चा इत्‍यादीवर निर्बंध
नांदेड जिल्‍हामधील सर्व शासकीय, निमशासकीय व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेची कार्यालये, विश्रामगृह या ठिकाणी खालील बाबीस प्रतिबंध करीत आहे. कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे. कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणणे, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे, कोणत्‍याही प्रकारचे सत्‍याग्रह करणे, धरणे-आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

शस्‍त्रे बाळगणे वाहून नेण्‍यावर निर्बंध
शस्‍त्र अधिनियम 1959 चे कलम 22 (1) (ख) नुसार आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणारे अधिकारी व कर्मचारी तसेच बँकेचे सुरक्षा गार्ड यांचे व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवान्‍यातील शस्‍त्रास्‍त्रे बाळगण्‍यास व वाहून नेण्‍यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin) या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्याचे www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ पाहावे. संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अटी व शर्ती अर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *