सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावा- जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी

नांदेड (प्रतिनिधी) :- खरीप हंगाम २०२६ मध्ये विविध योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तुर, मुग, उडीद, (पाच वर्षाच्या आतील वाण ६ हजार रुपये प्रत‍ि क्व‍िंटल व पाच वर्षा वरील परंतू १० वर्षाच्या आतील वाण- ३ हजार रुपये प्रत‍ि क्व‍िंटल अनुदान) या योजनेत अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील तेलबिया योजनेत सोयाबीन (५ वर्षांच्या आतील वाण ११ हजार रुपये प्रत‍ि क्व‍िंटल अनुदान) अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे.

प्रमाणित बियाणे वितरणासाठी सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांसाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *