नांदेड (प्रतिनिधी) :- जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आज “जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस” “Together for a Period Friendly india” या घोषवाक्याने साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एम पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अवसरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.से) डॉ. आर.एस. बुट्टे, तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या मेट्रन श्रीमती सुनिता राठोड, OPD इंचार्ज नारवाड सिस्टर, सर्व इंचार्ज सिस्टर, स्टाफ व महिला उपस्थित होत्या.
धनश्री अर्जुनराव गुंडाळे राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम समुपदेशक तसेच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट चा उजास उपक्रमाचे जिल्हा समन्वयक सुचित्रा भगत यांनी मासिक पाळी संदर्भात माहिती देऊन मासिक पाळी स्वछता दिवस का साजरा केला जातो, मासिक पाळी विषयी समाजात असलेले समज गैरसमज बद्दल मार्गदर्शन केले. मासिक पाळी म्हणजे काय ? तिचे व्यवस्थापन, सॅनेटरी पॅड चा उपयोग त्याची व्हीलेवाट या बद्दल माहिती देताना राष्ट्रीय मासिक पाळी कार्यक्रम सर्वेमध्ये असे निदर्शनास आले आहे की, सन २०१५-२०१६ मध्ये सॅनेटरी पॅड चा वापर ४१.८ टक्के होता तर यात वाढ होऊन सॅनेटरी पॅड वापर सन २०२०-२१ मध्ये ६४.१ टक्के इतकी वाढ झाली आहे म्हणजेच २२.३ टक्के नी वाढ झाली आहे. तर या वरून असे लक्षात येते की मासिक पाळी बाबत जागरुकता वाढून साधनांचा वापर वाढला आहे. मासिक पाळी कप हा शोषक साहित्य म्हणून आरोग्य तसेच निसर्गाला पोषक म्हणूनही महिला व मुलींमध्ये मासिक पाळी कप वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच मासिक पाळी मध्ये काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा घ्यावा, योगा हा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे या विषयी माहिती दिली तसेच मासिक पाळी विषयी समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी न लाजता बोलले म्हणजे मासिक पाळी स्वछता दिवस साजरा केला असा संदेश दिला.

