नांदेड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी  

नांदेड (प्रतिनिधी) :- नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती व गोंधळ निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र नांदेड शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा आणि नियमितपणे पुरवठा होत आहे. अचानकपणे डिझेलच्या मागणीत 25-30 टक्के वाढ झाल्याने, पॅनीक खरेदी होत असल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केला आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणेमार्फत यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गुरूवार 21 मे 2026 रोजीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 1 हजार 951 केएल (KL) पेट्रोल आणि 2 हजार 79 केएल (KL) डिझेलचा साठा उपलब्ध आहे.

नागरिकांना आवाहन व सूचना
* कोणत्याही अप्रमाणित अफवा, सोशल मीडियावरील चुकीचे संदेश किंवा माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
* भीतीपोटी किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल / डिझेल खरेदी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नये.
* पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
* अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून, अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
* नागरिकांना कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.

तक्रार निवारण संपर्क व्यवस्था
जिल्ह्यातील नागरिकांना पेट्रोल / डिझेलबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा
* व्हॉट्सअॅप चॅट बॉट सेवा ( WhatsApp Chat Bot) : 8668223326
* ई-मेल आयडी : dsonanded1@gmail.com

तालुकास्तरावरील संपर्क क्रमांक
नांदेड- 7030773040, अर्धापूर- 8805068954, मुखेड- 9356806405, धर्माबाद- 9421841447, मुदखेड- 9445112782, उमरी- 8805447837, बिलोली- 9637963222, लोहा- 9356806405, हिमायतनगर- 8308073089, हदगाव- 8805068954, कंधार- 9823757345, माहूर – 9403184473, किनवट- 9850296096, भोकर- 8421183602, देगलूर- 9423805064, नायगाव- 7057002865 याप्रमाणे आहेत.

नागरिकांनी शांतता, संयम व सहकार्य राखावे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन समस्येविषयी आढावा बैठकीत त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, तेल कंपनीचे विक्री अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *