प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय ५ वर्षापेक्षा अधिक व १८ वर्षापर्यत आहे, अशा मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तरी प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश डी. वाघ यांनी केले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ साठी केंद्र शासनाने नामनिर्देशन अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या मुलांचे वय ५ वर्षापेक्षा अधिक व ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षापेक्षा कमी असावे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरीलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यत करावेत. ३१ जुलै पर्यतच प्रस्ताव स्विकारले जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *