नांदेड (प्रतिनिधी) :- मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांचे वसतीगृह, उच्च शिक्षण, तथागत नगर, मालेगाव रोड, नांदेड या वसतीगृहात शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी नांदेड शहर परिसरातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीसाठी शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येत आहे.
प्रस्तुत वसतीगृहात शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठीच्या पुर्न-प्रवेश / नूतन प्रवेशाबाबत याव्दारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पुर्न- प्रवेश /नूतन प्रवेशाचे अर्ज वसतीगृहात कार्यालयीन वेळेत 15 ते 30 जून, 2026 या कालावधीत (शासकीय सुट्टयांचे दिवस वगळून ) उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
सदर कालावधीत परिपुर्ण पुर्न-प्रवेश / नूतन प्रवेशाचे अर्ज हे संबंधित विहित कागदपत्रांसह स्विकारण्यात येईल. वरील निश्चित केलेल्या कालावधीनंतरचे आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही याची विद्यार्थी पालक तथा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गृहप्रमुख मातोश्री शासकीय इबीसी मुलांचे वसतीगृह नांदेड यांनी केले आहे.

