नांदेड, (प्रतिनिधी) :- जिल्ह्याचे खरीप हंगामकरिता 456,000 हे सोयाबीन पिकाचे क्षेत्र पेरणी साठी प्रस्तावित करण्यात आले आहे . त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे सोयबिन बियाणे उपलब्ध होण्याकरिता जिल्ह्यातील निरीक्षक यांना सोयाबीन नमुने घेण्याचे लक्षांक देण्यात आला होता ,त्या नुसार जिल्ह्यातील बियाणे निरीक्षक यांनी सोयाबीन पिकाचे 751 नमुने तपासणीसाठी घेहून प्रयोगशाळेत पाठवले , प्रयोगशाळा प्राप्त अप्रमाणित अहवाल नुसार व बियाणे न उगवल्याच्या तक्रारी च्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत पाहणी करून बियाण्यात दोष आढळलेल्या खाली नमूद सोयाबीन बियाणे पुरवठादार व उत्पादक कंपनी विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच बियाणे कायदा १९६६ कलम 6,7,19,21 व बियाणे नियम १९६८ नियम 23 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318 (2 ) चे उलंघन केल्यामुळे जिल्ह्यातील खाली नमूद पोलिस स्टेशन निहाय बियाणे निरीक्षक मार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अ क्र गुणनियंत्रण निरीक्षक चे नाव व पदनाम कंपनीचे नाव गुन्हा क्र व दि. पोलिस स्टेशन
1 श्री अरविंद आकात कृषि अधिकारी प . स मुखेड बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. घेतला. गेवराई बाजार ता. बदनापूर जि. जालना. ०१५९ दि. 20.07.26 बिलोली
2 श्री श्यामगीर गिरी , कृषि अधिकारी ता कृ अ ,बिलोली पार्श्व जेनेटिक्स इंडिया, पेटलावाड झाबुआ (मध्य प्रदेश 0158 दि. 19.07.26 बिलोली
3 श्री संदीप कोसकेवार कृषि अधिकारी प . स. भोकर रवी सीड्स अँन्ड रिसर्च प्रा . लि ,इंदौर मध्य प्रदेश 0375 दि. 20.07.26 भोकर
4 श्रीमती स्वाती बंडू टेळे, कृषि अधिकारी ता कृ अ ,लोहा एस.के.बी. सिडस प्रा. लि. जानकी नगर इंदूर (मध्य प्रदेश 0173 दि. 19.07.26 सोनखेड
5 श्री गणेश यादव , कृषि अधिकारी प . स ,लोहा एशियन सिडस प्रा. ली. इंदोर (मध्यप्रदेश 0172 दि. 19.07.26 सोनखेड
6 श्री शिवराम मुंडे , कृषि अधिकारी प . स ,किनवट दप्तरी अॅग्रो प्रा.ली. ता. सेलू जि. वर्धा. 0176 दि. 19.07.26 किनवट
सदरील कारवाई ही मा. जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश पाटील मा . कृषि संचालक (नि व गुनि ) श्री . बोरकर साहेब , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दत्तकुमार कळसाईत, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड डॉ. निलकुमार ऐतवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून श्री सचिन कपाळे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, श्री अमोल पेकम जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांनी कारवाई सहकार्य केले व संबंधित तालुका बियाणे निरीक्षक यांचे द्वारे कारवाई करण्यात आली आहे.

