मुदखेड येथे २० जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

मुदखेड, (प्रतिनिधी) :- तहसील कार्यालय मुदखेड येथे तालुक्याच्या गरजु नागरीकांच्या तक्रारीचे निरासन करण्यासाठी सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता “लोकशाही दिन” चे आयोजन करण्यात आलेले असुन नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुदखेडचे तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर यांनी केले आहे.

सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय मुदखेड येथील सभागृहात तालुक्यातील गरजु नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबाराव्दारे “लोकशाही दिन” बैठकीचे आयोजन करण्या‍त आलेले आहे. या बैठकीत उपस्थित राहावयाचे परिपत्रक तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या खातेप्रमुखांना कळविण्यात आलेले आलेले असुन या दिवशी तालुक्यातील सर्व अधिकारीवृंदांनी तहसील कार्यालय मुदखेड या ठिकाणी वेळेवर उपस्थीत राहावे. अर्जदार नागरीकांनी त्यांच्या तक्रारी / निवेदन प्रथम संबंधित कार्यालयाकडे तसेच त्यांच्या वरीष्ठ कार्यालयाकडे सादर करावी. “लोकशाही दिवशी” त्यांच्या तक्रारीच्या अर्जाची प्रत सुलभ संदर्भासाठी त्यांनी आपल्या सोबत ठेवावी. या वेळी त्रयस्थाने सोबत येण्याची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *