नांदेड (प्रतिनिधी) :- जेईई JEE-Advanced 2026 परीक्षा रविवार १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ४ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.
या आदेशात नमूद केलेल्या आर.जी.जी. हायटेक डिजीटल झोन / राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, आय ऑन डिजीटल झोन विष्णुपुरी नांदेड, एसएसएस इंदिरा इंन्स्टीटूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी संयोग कॅम्पस नांदेड. श्री संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर नांदला दिग्रस खडकूत या ४ परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या परिसरात रविवार १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कार्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅल्क्युलेटर, ट्रॅन्टीस्टर, रेडिओ, लॅपटॉप, इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

