मराठावाड्याची देवगिरी लिंगम्पल्ली पर्यंत तर ….रायलसिमा परभणी पर्यंत कधी ?

नांदेड (प्रतिनिधी ) : तिरुपती ला जाण्यासाठी नांदेड आणि परभणीतून नियमित रोज रेल्वे नाही म्हणून निझामाबाद – तिरुपती रॉयल सीमा एक्सप्रेस ही रेल्वे परभणी पर्यंत वाढवण्याची मागणी बालाजी भक्त करीत आहेत

मराठवाड्यातील रेल्वे प्रवास्यांच्या सोई साठी सुरु करण्यात आलेली पूर्वीची नांदेड मुंबई देवगिरी एक्सप्रेस अगोदर नांदेड येथून चं सुटायची परंतु ती काही दिवस सिकंद्राबाद पर्यंत पळवली मग पुढे लिंगम्पल्ली पर्यंत ती रेल्वे आता जात आहे पण हजारो भक्तांना सोई ची ठरू शकणारी निझामाबाद तिरुपती रॉयल सीमा सुपर फास्ट एक्सप्रेस रेल्वे परभणी पर्यंत का येऊ शकत नाही?असा सवाल आता मराठवाड्यातील खासदार महोदयांना बालाजी भक्त विचारत आहेत

रॉयलसीमा रेल्वे परभणी पर्यंत वाढवल्यास हजारो बालाजी भक्तांना उत्तम सोय होणार असून दररोज हजारो भक्त तिरुपतीत दर्शनाला जातात व्यापारी दृष्टीने सिकंद्राबाद पर्यंत पण रेल्वे प्रवास्यांची मोठी सोय होणार आहे म्हणून मराठवाड्या तील खासदारांनी आता हा विषय रेल्वे मंत्री यांच्या कडे लावून घरला पाहिजे ही रेल्वे परभणी पर्यंत झाल्यास वेळेची बचत आणि थेट सुविधा होईल असा विस्वास परभणी जिल्हा भाजपा चे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *