धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 नांदेड (प्रतिनिधी) :- संपूर्ण महाराष्ट्रात सन 2024 पासून धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालकांनी ऑनलाईन नोंदणी करावी व या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.

या कल्याणकारी मंडळाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे.

वय 65 वर्षावरील चालकासाठी सन्मान निधी योजना, जीवन विमा व अपंगत्व विमा योजना कर्तव्यावर असताना, आरोग्य विषयक लाभ योजना, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य योजना, पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना.
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत बेवसाईटची लिंक https://ananddighekalyankarimandal.org आहे. या लिंकद्वारे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात.
नांदेड जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक संघटना तसेच रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक यांनी अधिकृत लिंकद्वारे सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.

सभासद नोंदणी पुढीलप्रमाणे करावी. वाहन मालकाचे नाव, वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक तसेच कुटूंबातील सदस्यांची माहिती, रेशन कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, इत्यादीची माहिती भरुन आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी. अर्जातील माहिती तपासून सर्व अटीची पुर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जातो. अर्जामध्ये त्रुटी असल्यास कार्यालयास संपर्क साधा असा संदेश प्राप्त होतो. अशा वेळी प्रादेशकि परिवहन कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी.

नोंदणी व ओळखीसाठी 500 व सभासद शुल्क 300 रुपये असे एकूण 800 रुपये शुल्क भरण बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिपक वाकोडे मो. क्र. 9834589717 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *