काल नांदेड जिल्ह्यात एक हजार ७३ व्यक्ती कोरोना बाधित तर १६ जणांचा मृत्यू

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात शनिवारी १ हजार ७३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. ४ हजार २५७ तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ५२८ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५४५ अहवाल बाधित आहेत. काल चे १ हजार ७३ बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३८ हजार ५९८ एवढी झाली आहे.

गुरुवार २५ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील ५५ वर्षाच्या एका महिलेचा, लोहा येथील ६० वर्षाच्या पुरुषाचा, तरोडा बु. नांदेड येथील ४० वर्षाच्या पुरुषाचा तर शुक्रवार २६ मार्च रोजी विष्णुपुरी नांदेड येथील ६७ वर्षाच्या पुरुषाचा, मुदखेड येथील ६५ वर्षाच्या पुरुषाचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे आनंदनगर नांदेड येथील ४२ वर्षाच्या महिलेचा, पिरबुऱ्हानगर नांदेड येथील ६५ वर्षाच्या पुरुषाचा, गुलजारबाग नांदेड येथील २८ वर्षाच्या पुरुषाचा, वजिराबाद नांदेड येथील ७२ वर्षाच्या महिलेचा, आनंदनगर नांदेड येथील ६५ वर्षाच्या महिलेचा, कंधार तालुक्यातील दाताळा येथील ५२ वर्षाच्या पुरुषाचा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे गणेश टॉकीज जवळ नांदेड येथील ६५ वर्षाच्या पुरुषाचा, हदगाव कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर तालुक्यातील पारवा येथील ७१ वर्षाच्या पुरुषाचा, नांदेड येथील ८० वर्षाच्या महिलेचा, माणिकनगर नांदेड येथील ५० वर्षाच्या पुरुषाचा, शनिवार २७ मार्च रोजी भोकर गांधी चौक येथील ६५ वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ७१३ एवढी झाली आहे.
कालच्या ४ हजार २५७ अहवालापैकी ३ हजार ६१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ३८ हजार ५९८ एवढी झाली असून यातील २८ हजार ५१८ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ९ हजार १३४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १०८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

काल बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १५ मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ४१५ , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ५ , कंधार तालुक्यांतर्गत ६ , मुखेड कोविड रुग्णालय २२ , देगलूर कोविड रुग्णालय ३ , धर्माबाद तालुक्यांतर्गत ४४ , मुदखेड तालुक्यांतर्गत १२ , हिमायतनगर तालुक्यांतर्गत २ , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड २५ , हदगाव कोविड रुग्णालय १० , किनवट कोविड रुग्णालय २ , बिलोली तालुक्यांतर्गत ५ , उमरी तालुक्यांतर्गत २० , माहूर तालुक्यांतर्गत ११ ,भोकर तालुक्यांतर्गत ६ , खाजगी रुग्णालय ३५ असे एकूण ६३८ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.८८ टक्के आहे.

कालच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २६५ , लोहा तालुक्यात १५ , हिमायतनगर ३ , कंधार १५ , परभणी १ , नांदेड ग्रामीण १८ , उमरी २५ , धर्माबाद ९ , देगलूर १५ , बिदर १ , हदगाव १८ , मुखेड ६० , मुदखेड १३ , भोकर ६ , बिलोली ५ , नायगाव ३१ , अर्धापूर ८ , उमरी २०  असे एकूण ५२८ बाधित आढळले.

कालच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २८९ , देगलूर तालुक्यात १८ , किनवट ३९ , मुखेड ३३ , नांदेड ग्रामीण २६ , धर्माबाद ४ , लोहा १० , नायगाव ३ , भोकर ३० , हिमायतनगर २ , माहूर ११ , उमरी ९ , बिलोली ३० , कंधार ३२ , मुदखेड १ , परभणी ८ असे एकूण ५४५ बाधित आढळले.

जिल्ह्यात ९ हजार १३४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २९०  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ९५ , जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ८७ , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड ११८ , किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ९४ , मुखेड कोविड रुग्णालय १६३ , देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २९ , जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर ५६ , बिलोली कोविड केअर  सेंटर १५१ , नायगाव कोविड केअर सेंटर ५४ , उमरी कोविड केअर सेंटर ४४ , माहूर कोविड केअर सेंटर ४० , भोकर कोविड केअर सेंटर ३ , हदगाव कोविड रुग्णालय ५२ , हदगाव कोविड केअर सेंटर ४१ , लोहा कोविड रुग्णालय १०३ , कंधार कोविड केअर सेंटर ३० , महसूल कोविड केअर सेंटर ८५ , हिमायतनगर कोविड केअर सेंटर ७ , धर्माबाद कोविड केअर सेंटर ५६ , मुदखेड कोविड केअर सेंटर २९ , अर्धापूर कोविड केअर सेंटर ४५ , बारड कोविड केअर सेंटर १४ , मांडवी कोविड केअर सेंटर १७ , नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ७५७, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १ हजार १९१  खाजगी रुग्णालय ४८२, लातूर येथे संदर्भीत १ आहेत.

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड ४०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे २० एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब – २ लाख ९७ हजार ४८०
एकुण निगेटिव्ह स्वॅब – २ लाख ५२ हजार ६२४
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – ३८ हजार ५९८
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – २८ हजार ५१८
एकुण मृत्यू संख्या – ७१३
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.८८ टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – ११
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – १००
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ४०९
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ९ हजार १३४
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-१०८.

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. ९८५०९७८०३६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. ९३२५६०७०९९, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण ९९७००५४४३४ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *