३६ कोरोना बाधितांची भर तर ४३ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड :- गुरुवार १९ नोव्हेंबरच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात ४३ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ३६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १८ तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे १८ बाधित आले.

कालच्या एकुण १ हजार ३५८ अहवालापैकी १ हजार २२३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १९ हजार ७७३ एवढी झाली असून यातील १८ हजार ७८२ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण २५८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १९ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

काल प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५४३ झाली आहे.
काल बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ८, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १, खाजगी रुग्णालय ८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड २, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १७, औरंगाबाद येथे संदर्भित १ असे एकूण ४३ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.
कालच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १४, मुदखेड तालुक्यात १, हिंगोली १ , नांदेड ग्रामीण १, हदगाव १ असे एकुण १८ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ७, अर्धापूर तालुक्यात १, देगलूर १, हदगाव २, नांदेड ग्रामीण ४, मुदखेड २, मुखेड १ असे एकुण १८ बाधित आढळले.

जिल्ह्यात २५८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे २२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे २४, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ८३, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ७, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ११, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ८, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण ३, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण १४, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १४, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४, खाजगी रुग्णालय ३२, हैदराबाद येथे संदर्भित १, औरंगाबाद येथे संदर्भित १, लातूर येथे संदर्भित ४, अकोला येथे संदर्भित १ आहेत.

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १७०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७९ एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब – १ लाख ३० हजार ५७०
निगेटिव्ह स्वॅब – १ लाख ७ हजार ८८९
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – १९ हजार ७७३
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – १८ हजार ७८२
एकूण मृत्यू संख्या – ५४३
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के
काल स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -१५
काल स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – ८२
काल प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ६६९
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – २५८
काल रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले -१९ .

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *