आज जिल्ह्यात आगीच्या ३ घटना घडल्या

नांदेड :- सध्या सवर्त्र दिवाळीच्या सणामुळे आनंदी वातावरण असतानाच आज पहाटे २ वाजून २५ मिनिटाने लोहा तालुक्यातील मारतळा येथे उमेश दिगंबरराव कदम यांच्या बालाजी कपडा दुकानात आग लागली. हे दुकान इमारतीच्या तळ मजल्यावर आहे व कपडा दुकानाच्या बाजूला पंचायत समिती सभापती श्री बालाजीराव पाटील यांचे कार्यालयआहे. तर पहिल्या मजल्यावर राहते घर आहे. पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर येत होता म्हणून अग्निशमन दलास पाचारण केले आसता अग्निशमन दल अग्निशमन वाहना सह घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाने आग पहिल्या मजल्यावर व बाजूच्या कार्यालयापर्यंत पोहचू दिली नाही व आग आटोक्यात आणली. त्यात कापड दुकान जाळून खाक झाले.

आगीची दुसरी घटना

आज दुपारी १२.५० वाजता अण्णाभाऊ साठे चौका समोरील सैलानी हॉटेलच्या पाठीमागे एका स्कार्पियो कारला ( MH – 13- AC- 777 ) आग लागली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचले व कारला लागलेली आग आटोक्यात आणली.

आगीची तिसरी घटना

आज दुपारी ३ वाजता हैदराबाद रोड काकांडी जवळ श्री बालाजी पेट्रोल पंपासमोर श्री शर्मा यांचा लोखंडी पाईपने भरलेला GJ-12-DK- ३७३५ हा ट्रक उभा होता. हा ट्रक तेलंगण्याहुन धुळे कडे जाणार होता त्यास अचानक आग लागली. मनपा अग्निशमन दल व एम आय. डि. सी. अग्निशमन दल अग्निशमन वाहना सह घटनास्थळी पोहचले व आग वीजवली त्यांनी आग पसरू दिली नाही व लागलेली आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठी हानी झाली असती. सुदैवाने वरील तीनही घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *