सचिनला मागे टाकत, रोहितचा षटकारांचा विक्रम

 मुंबई : वेस्ट इंडिजविरोधातील चौथ्या वनडेत रोहित शर्माने १६२ धावांची तुफानी खेळी करत रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा षटकारांचा विक्रमही मोडीत काढला. रोहितने १३७ चेंडूत २० चौकारसह  ४ षटकार मारले. ४ षटकारांची भर पडल्याने रोहितचे वन डे सामन्यात एकूण १९८ षटकार झाले आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये रोहित जगभरात ७वा फलंदाज आणि दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

जागतिक क्रमवारीत षटकारांच्या बाबतीत ७व्या स्थानावर नोव्हेंबरमध्ये सचिन तेंडुलकरचं नाव होतं. ४६३ वन डे सामने खेळलेल्या सचिन तेंडुलकरने ४५२ डावांमध्ये १९५ षटकार लगावले होते. आता रोहितला षटकारांचे द्वीशतक करण्यासाठी फक्त दोन षटकारांची गरज आहे.भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम महेंद्र सिंग धोनीच्या नावावर आहे. धोनी आतापर्यंत ३३१ वन डे सामने खेळला आहे. त्याने वन डे सामन्यातील २८१ डावात एकूण २१८ षटकार लगावले आहेत. त्यामुळे धोनी भारतीय खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर तर जगातिक क्रमावारीत चौथ्या स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *