अनुष्का भारतीय संघाची सदस्य आहे का? रहाणेला शेवटच्या रांगेत उभं केल्यानं नेटीझन्स संतापले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिले १४ दिवस भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नींपासून दूर राहण्यास बजावले होते. त्यानंतरही अनुष्का शर्मा भारतीय संघासोबत दिसून आली. त्यानंतर नेटीझन्सने बीसीसीआय आणि विराट कोहलीवर टीका केली आहे.

उद्या भारतीय संघ लॉर्डसवर दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्यापूर्वी लंडनमध्ये विराटसेनेने येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. बीसीसीआयने भारतीय दुतावासाला भेट दिल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये भारतीय संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही दिसत आहे. त्यावरून नेटीझन्सनी खिल्ली उडवली आहे. या फोटोमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्काला पहिल्या रांगेचा मान देण्यात आला आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शेवटी चौथ्या रांगेत ठेवल्याने नेटिझन्सने चांगलेच संतापलेले. खेळाडूंच्या पत्नी अशा भेटींवेळी का उपस्थित असतात, अनुष्का भारतीय संघाची सदस्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

सोशल मीडियावर पुन्हा एकदा अनुष्का शर्माला ट्रोल केले जात आहे. अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत तर उपकर्णधार अजिंक्य शेवटच्या का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. तसेच अनुष्का शर्मा भारतीय संघाची सदस्य आहे का? असाही प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. अनुष्का शर्माशिवाय भारतीय संघातील खेळाडूंच्या पत्नी का दिसत नाही? भारतीय संघ परदेश दौऱ्यावर गेला आहे की हानिमूनला? असे प्रश्न सोशल मीडियावर नेटीझन्स विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *